तुमच्या शिकवणीत वापरा — मोफत
खाली दिलेले सर्व खेळ, प्रश्नमंजुषा आणि प्रयोग तुम्ही तुमच्या खासगी शिकवणीत वापरू शकता — शेअर करा किंवा डाउनलोड करा. परवानगी मागायची गरज नाही, नोंदणी नाही, पैसे नाहीत.
कसं वापरायचं
- वर्गात, इंटरनेटसह: कोणताही खेळ उघडा आणि प्रोजेक्टरवर दाखवा.
- मुलांना किंवा दुसऱ्या शिक्षकांना द्यायचंय? शेअर बटण दाबा — WhatsApp वर लिंक जाते आणि ती उघडली की थेट खेळ सुरू. काही डाउनलोड करायची गरज नाही.
- इंटरनेट नसेल तर: ऑफलाइनसाठी बटणाने फोल्डर घ्या, unzip करा आणि आतल्या index.html वर दोनदा क्लिक करा — खेळ, आवाज आणि बाप्पा सगळं इंटरनेटशिवाय चालेल.
- वर्गापूर्वी: एकदा स्वतः खेळून बघा — प्रत्येक खेळ 2–3 मिनिटांचा आहे.
एकच अट
प्रत्येक खेळाच्या वरती BappaTutions ची छोटी पट्टी असते. ती तशीच ठेवा — काढू नका, झाकू नका, बदलू नका. बाकी सगळं तुमचं.
तुमच्या शिकवणीचे पैसे तुम्ही घ्या — आमच्या फाइल्स विकू नका. एवढंच.
वापरण्यासाठी तयार
✏️ उभी आणि आडवी रेषा गिरव वरून खाली उभी रेषा, मग डावीकडून उजवीकडे आडवी रेषा गिरवा.
✏️ तिरपी आणि वक्र रेषा गिरव दोन्ही बाजूंच्या तिरप्या रेषा आणि वळणाची वक्र रेषा गिरवा.
🐾 जिराफ, झेब्रा आणि कांगारू ओळखा तीन चित्रांपैकी सांगितलेला प्राणी ओळखा.
तुमच्या विषयासाठी हवंय?
तुम्ही शिकवत असलेल्या धड्यासाठी खेळ किंवा प्रश्नमंजुषा हवी असेल, तर यूट्यूब चॅनेलवर कमेंट करा — आम्ही तयार करू.
▶ चॅनेलवर सांगा