तुमच्या शिकवणीत वापरा — मोफत
खाली दिलेली सर्व सादरीकरणे, खेळ आणि प्रयोग तुम्ही तुमच्या खासगी शिकवणीत वापरू शकता. परवानगी मागायची गरज नाही, नोंदणी नाही, पैसे नाहीत.
कसं वापरायचं
- वर्गात, इंटरनेटसह: कोणताही खेळ उघडा आणि प्रोजेक्टरवर दाखवा.
- इंटरनेटशिवाय: खेळाचं पान उघडा → ब्राउझरमध्ये
Save page as… करा → तो फोल्डर लॅपटॉपवर ठेवा. तिथे
index.htmlउघडलं की खेळ इंटरनेटशिवाय चालेल. - वर्गापूर्वी: एकदा स्वतः खेळून बघा — प्रत्येक खेळ २–३ मिनिटांचा आहे.
एकच अट
प्रत्येक खेळाच्या वरती BappaTutions ची छोटी पट्टी असते. ती तशीच ठेवा — काढू नका, झाकू नका, बदलू नका. बाकी सगळं तुमचं.
तुमच्या शिकवणीचे पैसे तुम्ही घ्या — आमच्या फाइल्स विकू नका. एवढंच.
वापरण्यासाठी तयार
तुमच्या विषयासाठी हवंय?
तुम्ही शिकवत असलेल्या धड्यासाठी खेळ किंवा सादरीकरण हवं असेल, तर यूट्यूब चॅनेलवर कमेंट करा — आम्ही तयार करू.
▶ चॅनेलवर सांगा