हे खेळ मुलाने एकटं बसून खेळावेत असे नाहीत. तुम्ही शेजारी बसा, प्रश्न विचारा, आणि उत्तर बरोबर आलं की टाळी द्या. तेवढंच पुरेसं आहे.
तुमच्या मुलासाठी
बाप्पा शिकवतो ते सगळे विषय, सोबत करता येतील अशा छोट्या धड्यांत.
तुमच्यासाठी
कारण प्रश्न फक्त मुलांपुरते नसतात.
धडे पालकांसाठी इंग्रजी कोणीच न शिकवलेलं इंग्रजी — भाव विचारणं, शिक्षकांना भेटणं, मुलं शाळेतून आणतात ते शब्द. एका धड्याला दहा मिनिटं, मराठीतून. पहिला धडा सुरू करा एकवीस धडे मुलाला समजून घेताना तो ऐकत का नाही, या वयात काय जमत नाही, आणि आपल्याशी कोणीच न केलेले संवाद. कोर्स सुरू करा नऊ गोष्टी बाप्पाची शिकवण कोणीतरी तुमच्या बुटावर पाय देतं. त्याला चार सेकंद लागतात, पण पुढचा अक्खा दिवस खराब होतो. धरून ठेवण्यावर आणि सोडून देण्यावरच्या नऊ गोष्टी. गोष्टी वाचा नव्वद शब्द ते नेमकं काय म्हणतायत तुमचं मूल नेमकं काय म्हणतंय. Bunk, proxy, senti, lafda आणि फोनमधून आलेले शब्द. जाणून घ्या
किंवा कोणताही निवडा
प्रत्येक अक्षराचा आणि प्रत्येक अंकाचा स्वतःचा धडा आहे — पाच चित्रं जी स्वतः बोलतात, मग खेळ, मग व्हिडिओ.
प्राणी
आपल्या भोवती
एक छोटा क्रम
1 एकत्र व्हिडिओ बघा यूट्यूबवर 4–5 मिनिटांचा एक धडा. मुलाला मोठ्याने बोलायला सांगा.
2 मग खेळ खेळा त्याच धड्यावरचा खेळ. चुकलं तरी चालेल — वेळेचं दडपण नाही.
3 दिवसभर एकदा विचारा जेवताना "आज काय शिकलास?" — शिकलेलं तिथेच पक्कं होतं.
आजच करून बघा
आम्ही काय गोळा करत नाही
या साइटवर लॉगिन नाही, खातं नाही. तुमच्या मुलाचं नाव, वय किंवा फोटो आम्ही कधीच मागत नाही — कारण त्याची गरजच नाही.